कंटेरनरची दुचाकीला धडक; एक ठार

By Admin | Updated: July 25, 2016 23:11 IST2016-07-25T22:45:48+5:302016-07-25T23:11:26+5:30

कंटेरनरची दुचाकीला धडक; एक ठार

Container's bicycle hit; One killed | कंटेरनरची दुचाकीला धडक; एक ठार

कंटेरनरची दुचाकीला धडक; एक ठार

मालेगाव : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथे बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवर जात असताना ढोलबारे येथे दुपारी कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तळवाडे दिगर येथील महिला ठार झाली असून, पती गंभीर जखमी झाला आहे.
दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ताहाराबादकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र. आरजे ०७ जीबी ४२२९) दुचाकीला धडक दिली. यात भारती भाऊसाहेब अहिरे (४५) या जागीच ठार झाल्या, तर भाऊसाहेब चिंतामण अहिरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. याप्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Container's bicycle hit; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.