भगूर रेल्वे गेटमध्ये कंटेनर अडकला; वाहतूक खोळंबळी
By Admin | Updated: June 15, 2017 13:42 IST2017-06-15T13:42:27+5:302017-06-15T13:42:27+5:30
येथील भगूर गावाजवळील रेल्वे फाटकातून मार्गस्थ होणारा कंटेनर मध्येच अडकल्याने वाहतूक खोळबंळी आहे.

भगूर रेल्वे गेटमध्ये कंटेनर अडकला; वाहतूक खोळंबळी
नाशिक : येथील भगूर गावाजवळील रेल्वे फाटकातून मार्गस्थ होणारा कंटेनर मध्येच अडकल्याने वाहतूक खोळबंळी आहे. सुदैवाने कंटेनर रुळापासून लांब राहिल्यामुळे रेल्वे वाहतूकीला धोका निर्माण झाला नाही. कंटेनरची चेसी मागेच होती रेल्वे फाटकमधून येताना चालकाचे कॅबीन अडकले. यामुळे मोठ्या लांबीचा कंटेनर रेल्वे रुळापासून लांब राहिला. कॅबिन फाटकामधून पुढे निघाले असते आणि मागील चेसी अडकली असती तर कदाचित रेल्वे वाहतूकीलाही याचा फटका बसला असता; मात्र सुदैवाने तसे झाले नाही. रेल्वे फाटकामधील उंची कमी असल्यामुळे कंटेनर अडकल्याचे बोलले जात आहे.
चालकासह परिसरातील नागरिक अडकलेला कंटेनर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.