कसारा घाटात कंटेनर नादुरुस्त ; चार तास वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:10 IST2018-02-17T01:10:29+5:302018-02-17T01:10:45+5:30
शुक्रवारी पहाटे जुन्या कसारा घाटात कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या मधोमध थांबल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग ठप्प झाला होता. परिणामी प्रवाशांचे हाल झाले.

कसारा घाटात कंटेनर नादुरुस्त ; चार तास वाहतुकीचा खोळंबा
इगतपुरी : शुक्रवारी पहाटे जुन्या कसारा घाटात कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या मधोमध थांबल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग ठप्प झाला होता. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास नाशिककडे जाणारा कंटेनर (क्र. आरजे ३२ जीए ८४६५) महामार्गावर मधोमध बंद पडल्याने व त्याचे डिझेलही संपल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या ढसाळ नियोजनामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मात्र पिकइन्फ्राच्या पेट्रोलिंगच्या कर्मचारी विजय कुंडगर, दीपक मावरीया, अर्जुन करपे, उमेश निकम, अनिल ठाकूर यांना माहिती मिळताच तेथे त्यांनी धाव घेऊन घोटी टॅब वाहतूक पोलिसांच्या मदतीने प्रथम लतीफ वाडी येथील नवीन कसारा घाटातून व जव्हार फाटा पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली व कंटेनरचालकाला बिघाड झाल्याने तेथे क्रे नच्या साह्याने काढून तब्बल तीन ते चार तासानी वाहतूक सुरळीत करण्यात आली.