पाच दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 23:45 IST2016-02-15T23:43:10+5:302016-02-15T23:45:22+5:30

पाच दुकाने भस्मसात

Consumption of five shops | पाच दुकाने भस्मसात

पाच दुकाने भस्मसात

लासलगाव : सुमारे सहा लाखांचे नुकसानलासलगाव : येथील आंबेडकर रस्त्यावरील दुकानांना सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सुमारे पाच लाख ८३ हजारांची हानी झाली.
सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत पाचही दुकाने पूर्णत: खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर सुरेश पांडुरंग आंबेकर यांचे फेमस सलून दुकानाचे आगीत दोन लाख ७२ हजारांचे सलून साहित्य जळून खाक झाले. किरण रामभाऊ बोराडे यांचे मालकीचे दुकानातील एकोणचाळीस हजार, संजय वासुदेव झांबरे यांचे टेलरींग दुकानातील एक लाख १९ हजार रु पयांचा माल, गणेश वासुदेव झांबरे यांचे रेडिओ रिपेअरिंग दुकानांतील एक लाख २९ हजाल ८०० रुपये तर मदनलाल मिश्रीलाल बाफना यांच्या मिसळ दुकानातील वीस हजार रुपये असे साहित्य भस्मसात झाले. या आगीत पाच लाख त्र्याऐंशी हजारांची हानी झाली. पहाटे आग लागल्याने आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत भस्मसात झालेल्या दुकानाच्या नुकसानीचे पंचनामे लासलगावचे तलाठी पी.एस. गांगोडे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Consumption of five shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.