शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा खर्च करण्याकडे ग्राहकांचा कल ; बँकांमध्येही ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:53+5:302021-02-05T05:44:53+5:30
नाशिक : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शंभर, दहा आणि पाच रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ...

शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा खर्च करण्याकडे ग्राहकांचा कल ; बँकांमध्येही ग्राहकांची गर्दी
नाशिक : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शंभर, दहा आणि पाच रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त विविध माध्यमातून प्रसारित होत असून या निर्णयानंतर जुन्या नोटा या इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा खर्च करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून बँकांमध्येही जुन्या नोटा जमा करणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. बँकांना अद्याप रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात कोणतीही स्पष्ट सूचना नसली तरी दैनंदिन व्यवहारांमध्ये जुन्या नोटा वाढल्याने किरकोळ घाऊक व्यापाऱ्यांकडून या जुन्या नोटांचा बँकेत भरणा होत आहे.
रिझर्व्ह बँकेकडून शंभर, दहा आणि पाच रूपयांच्या जुन्या नोटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. तसेच या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू आहे. परंतु अद्याप नशिक जिल्ह्यातील बँकांना याविषयी रिझर्व्ह बँकेने कोणतीही अधिकृत सूचना केलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९ मध्ये शंभर रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. मात्र नोटाबंदीच्या वेळी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. तर सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे संकेत आहेत.
इन्फो-१
बँकांना अद्याप कोणत्याही सूचना नाही
शंभर, दहा आणि पाचच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत मागविल्या जाण्यासंबंधी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून वृत्त प्रसारित होत असले तरी नाशिक जिल्ह्यातील बँकांना मात्र अद्याप याविषयी कोणतीही स्पष्ट सूचना मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इन्फो-२
शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा खर्च करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून बँकांमध्येही जुन्या नोटा जमा करणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. बँकांना अद्याप रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात कोणतीही स्पष्ट सूचना नसली तरी दैनंदिन व्यवहारांमध्ये जुन्या नोटा वाढल्याने किरकोळ घाऊक व्यापाऱ्यांकडून या जुन्या नोटांचा बँकेत भरणा होत आहे.
कोट-१
ग्राहकांकडून किराणा खरेदी करताना जुन्या शंभरच्या नोटांचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. अद्याप बँकांकडून या नोटांविषयी कोणतीही सूचना केली नाही त्यामुळे रोज येणाऱ्या जुन्या नोटा बँकेच्या भरण्यात जमा केल्या जातात. सोशल मीडियात या नोटा मागे घेण्यासंदर्भात चर्चा असल्याने पूर्वी पेक्षा या नोटांचा ओघ वाढला आहे.
-प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना,नाशिक
कोट-२
गेल्या दोन तीन दिवसांपासून ग्राहकांकडून जुन्या नोटांचा वापर अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने यात शंभर रुपयांच्या जुन्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. मात्र अद्याप बँकेने या संदर्भात कोणतीही सूचना केलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून नेहमीप्रमाणेच व्यवहार सुरू आहेत.
-शेखर दशपुते, माजी अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी संघटना
कोट- ३
सोशल मीडियात शंभरच्या जुन्या नोटा मागे घेतल्या जाण्याची चर्चा आहे. त्याचा चलन व्यवहारावरही परिणाम झाला आहे. पूर्वी दोन हजारची नोट सहज वापरणारे ग्राहकही आता शंभरच्या नोटांचा वापर करीत असून यात जुन्या नोटांचेच प्रमाण अधिक आहे. बँकेत सर्वच नोटांचा एकसोबत भरणा केला जातो. पण बँकेकडून अद्याप या नोटांविषयीही काहीही सांगितलेले नाही.
अरुण जाधव ,किराणा व्यापारी