शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

23 टक्क्यांनी वाढले पेन्शन योजनांचे ग्राहक; खाती पोहोचली ४.२४ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:35 IST

वर्षातील प्रगती : खाती पोहोचली ४.२४ कोटींवर

नाशिक : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणा (पीएफआरडीए) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत असलेल्या खात्यांमध्ये सन २०२०-२१मध्ये २३ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली असून आता या खात्यांची संख्या ४.२४ कोटींवर पोहोचली आहे. वृद्धापकाळाचा आधार म्हणून पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या नागरिकांची संख्या आता वाढताना दिसत आहे. 

पीएफआरडीएमार्फत राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), अटल पेन्शन योजना या पेन्शनच्या योजना राबविल्या जात असतात. गतवर्षामध्ये या दोन्ही योजनांमधील खात्यांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण खातेधारकांची संख्या वाढून ४  कोटी  २४ लाखांवर पोहोचली आहे. गतवर्षामध्ये कोविडच्या संकटाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे सुमारे सहा महिने सर्वच आर्थिक व्यवहार बंद राहिलेले असतानाही पेन्शन योजनांना मिळालेला प्रतिसाद लक्षणीय आहे. या वर्षामध्ये पेन्शन योजनांकडे असलेल्या रकमेमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

३१ मार्चअखेर पेन्शन योजनांच्या व्यवस्थापनाखाली असलेली संपत्ती ५.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.  नॅशनल पेन्शन स्कीमखाली जमा असलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळत आहे. या वर्षामध्ये ११०० नवीन कंपन्या या योजनेमध्ये दाखल झाल्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या कॉर्पोरेट क्षेत्राला १६ टक्के तर अन्य खातेधारकांना ३२ टक्के परतावा मिळाला आहे. 

सरकारने सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त अन्य नोकरदारांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनीच गुंतवणूक करून आपल्या वृद्धापकाळाची सोय करण्यासाठी पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. पीएफआरडीएच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली असलेल्या या योजनांमधून ग्राहकांना चांगला परतावा मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्यानेच दाखल होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या नवीन पेन्शन योजनांमध्ये सहभाग घ्यावा लागत असतो. याशिवाय अन्य  व्यावसायिकही या योजनांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे वृद्धापकाळी पेन्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळत राहू शकते.

अटल पेन्शन योजनेत ७७ लाख नवीन ग्राहक

या वर्षामध्ये अटल पेन्शन योजनेमध्ये ७७ लाख नवीन ग्राहक सहभागी झाले असून या योजनेमधील वाढीचे प्रमाण ३३ टक्के आहे. आता या योजनेखालील खातेधारक २.८ कोटींवर पोहोचले आहेत. एनपीएस योजनेमध्ये ६ लाख नवीन ग्राहक दाखल झाले असून येत्या आर्थिक वषार्मध्ये ही संख्या १० लाखांवर नेण्याचा मनसुबा ठेवण्यात आला आहे. या योजनेतील ग्राहक वृद्धी ११ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

टॅग्स :Nashikनाशिक