शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला  खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:29 AM

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले.

नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीनंतर चौथ्या शनिवारी सुटी असल्याने शासकीय, खासगी कर्मचारी तसेच औद्योगिक कामगारांनी सहकुटुंब बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्यामुळेरात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी दिसून आली.शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याने शनिवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरणासोबतच टिपटिप पाऊस सुरू असला तरी ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वांना कपडे, सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमातेची प्रतिमा, मूर्ती, पूजा साहित्य, पणत्या, अकाशकंदील, केरसुनीसह किराणा, सुकामेवा, कपडे, खाद्यपदार्थ, भेटवस्तूंची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. शहरातील बाजारपेठांसह विविध मॉलमधील सवलतीकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणात आक र्षित झाल्याचे पाहायला आले. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज,वॉशिंगमशीन, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. त्याचप्रमाणे अनेकांनी दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.तयार फराळ, मिक्स मिठाईला मागणीपारंपरिक दीपोत्सवाचा उत्साह घरोघरी दिसून येत असला तरी सध्याच्या काळात अनेक गृहिणी नोकरी, व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना फराळाचे पदार्थ करण्यासाठी वेळ मिळत नाही परिणामी मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही तयार फराळ तसेच मिक्स मिठाई, काजू कतलीसह सर्वच मिठाईला मोठी मागणी असल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. कॉलनी किंवा सोसायटीत एकत्रित येऊन पदार्थ करण्यासोबतच आचाऱ्यांकडून फराळाचे पदार्थ तयार करून घेण्याचाही पर्याय वापरला गेला.सराफ बाजाराला झळाळीधनत्रयोदशीला नाशिकच्या सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या भांड्याची खरेदी केल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली. त्यामुळे सराफ बाजाराला झळाळी प्राप्त झाली असून, लक्ष्मीपूजनासाठी अनेक जणांनी सोनेखरेदीची तयारी केली आहे.नवीन घरात लक्ष्मीपूजनदिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या स्वप्नातील घराची खरेदी केली असून, ज्या ग्राहकांना घराचा ताबा मिळाला आहे, त्यांनी आपल्या नवीन घरात लक्ष्मीपूजनाची तयारी केली आहे. त्याचप्रमाणे काही ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घराची बुकिंग करण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार