शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

मनोरंजन वाहिन्यांची निवड करण्यात ग्राहकांच्या अडचणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 16:30 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  परंतु,  या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्याक डूनही सहकार्य मिळत नसल्याने  ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रेक्षपण करणाया कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही  साडे तीनशे ते चारशे रुपये महिन्यांचे पॅकेज ग्राहकांवर लादले जात असल्याचा प्रकार सुरू आहे

ठळक मुद्देग्रामीण केबल चालकांकडून ग्राहकांवर पॅकेज लादण्याचा प्रकार ट्रायच्या नवीन नियमांनतरही ग्राहकांना अनावश्यक चॅनलचा भूर्दंड

नाशिक : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  परंतु,  या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्याक डूनही सहकार्य मिळत नसल्याने  ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रेक्षपण करणाया कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही  साडे तीनशे ते चारशे रुपये महिन्यांचे पॅकेज ग्राहकांवर लादले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटूनही चॅनल निवडताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी नवे नियम लागू होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जुन्याच पॅकजचे रिचार्ज करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक वाहिन्यांसाठीही शुल्क भरावे लागत असून  ट्रायच्या नवीन नियमांनंतरही केबल आॅपरेटर आणि ब्रॉडकास्टींग कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खुल्या पद्धतीने आवडीचे एक-एक चॅनल निवडण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही. केबल अथवा प्रेक्षपित वाहिन्यांवरून पॅकज निवडण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. प्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान नसल्याने ग्राहकांना ट्रायच्या नव्या नियमानुसार मनोरंजनाचा आनंद घेता येत नाही. ट्रायच्या नवीन नियमानुसार देशभरात वाहिन्यांचे एकसमान दरपत्रक ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये सशुल्क वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्यासाठी पाच पैशापासून ते १९ रुपयांपर्यंत किमती ठरवण्यात आल्या आहेत. तसेच चॅनल निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे. त्यामध्ये १५३ रुपये ४० पैशांचा बेसिक पॅक घेऊन त्यानंतर आपल्याला हव्या त्या सशुल्क वाहिन्या असे हे गणित असले तरी केबलचालक आणि डीटीएच कं पन्यांकडून ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना अजूनही अनावश्यक तथा बीगर आवडीच्या चॅनलचेही पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

जाहीरातींना बळी पडू नकाट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी काही वेळ जावा लागणार आहे. चॅनल निवडीची प्रक्रिया क्लीष्ट असून सुशिक्षीत ग्राहकांनाही चॅनल निवडण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागत आहे. परंतु, ग्राहकांना प्रक्रिया समजून घेत आपल्या आवडीचे चॅनल  मिळविण्यासाठीच आग्रह धरण्याची गरज आहे. चॅनल निवडताना प्रेक्षपण कंपन्यांच्या जाहीरातींना बळी न पडता तसेच केबल आॅपरेटरला परस्पर पॅके ज ठरविण्याचे अधिकार न देता स्वत: ही प्रक्रिया समजून चॅनलची निवड केल्यास ट्रायच्या नवीन नियमांचा निश्चित फायदा होईल- प्रा. दिलीप फडके, ग्राहक मंच, नाशिक .

कंपन्यांच्या पॅकेजमध्ये अनावश्यक चॅनलट्रायच्या नवीन नियमांनुसार चॅनलची निवड करताना डीटीएच कंपन्यांचे सहकार्य मिळत नाही. ग्राहक सेवा प्रतिनिधीची मदत घेण्यासाठी तासंतास प्रतिक्षा करून डीटीएच कंपन्यांचा ग्राहक सेवा प्रतिनिधी योग्य मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे कंपन्यांनी जाहीर केलेले पॅकेज घेण्यासाठी साडेतीनशे ते चारेशे रुपयांचे पॅकेज घ्यावे लागतात. त्यात अनेक अनावश्यक चॅनलचा समावेश असून पॅकेज घेताना त्याच्यासाठीही पैसे मोजावे लागतात. -विलास पवार, ग्राहक, नाशिक. 

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायNashikनाशिकTelevisionटेलिव्हिजनconsumerग्राहक