ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपप्रमुखपदी महाले
By Admin | Updated: March 19, 2016 23:44 IST2016-03-19T23:26:47+5:302016-03-19T23:44:43+5:30
ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपप्रमुखपदी महाले

ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपप्रमुखपदी महाले
सटाणा : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष नाशिक जिल्ह्याच्या उपप्रमुखपदी बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांची निवड करण्यात
आली. शिवसेनेच्या एका विशेष कार्यक्र मात ही घोषणा करण्यात आली.
शिवसेना ग्राहक संरक्षण नाशिक जिल्ह्याचे कक्षप्रमुख अनिल गायखे यांनी महाले यांना नियुक्ती पत्र दिले.
सामान्य ग्राहकांवर होणारा अन्याय, त्यांची होणारी आर्थिक लूट यास आळा बसवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहे. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही महाले यांनी दिली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत असून,
या प्रसंगी माजी समाज कल्याणमंत्री बबन घोलप, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, दत्तात्रेय गोतिसे, खंडेराव गांगुर्डे, सटाणा शिवसेनेचे शहरप्रमुख शरद शेवाळे, युवा सेनेचे शहरप्रमुख
सचिन सोनवणे आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)