बांधकाम कामगारांचा विमा पुन्हा सुरू होणार
By Admin | Updated: November 14, 2015 22:33 IST2015-11-14T22:32:33+5:302015-11-14T22:33:26+5:30
बांधकाम कामगारांचा विमा पुन्हा सुरू होणार

बांधकाम कामगारांचा विमा पुन्हा सुरू होणार
नाशिक : सीटू प्रणीत बांधकाम कामगार समन्वय समितीचा मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडलेला कामगारांचा वैैद्यकीय विमा येत्या आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी कामगारांच्या वतीने कामगार आयुक्त कुलकर्णी व बांधकाम कामगार मंडळाचे सचिव राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची महाराष्ट्रात तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या कायद्याच्या अंतर्गत कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली व त्या अंतर्गत जमा झालेल्या सुमारे चार हजार कोटी रुपयांमधून युती सरकारने शंभर कोटी रुपयेदेखील खर्च केला नसल्याने हा निधी पडून असल्याचे सांगण्यात आले. कामगारांची अंत्यसंस्कार योजना, बाळंतपण आर्थिक सहाय्य योजना, शिष्यवृत्तीचे प्रकरण, वारसांचे लाभ आदि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी बांधकाम कामगारांना टुलकिटसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येतील तसेच बंद पडलेली वैद्यकीय विमा योजना आठ दिवसांत सुरू करण्यात येईल व राज्यातील नाका कामगारांनाही मंडळात नोंदणी करण्यात येऊन सर्व जिल्ह्यांतील लाभार्थींचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कामगार आयुक्तांनी दिले. याचर्चेत सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, सिंधू शार्दुल आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)