The construction worker helped the hunger strike workers | उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला सरसावले बांधकाम व्यावसायिक

उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला सरसावले बांधकाम व्यावसायिक

सिन्नर : शहर व परिसरात उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला बांधकाम व्यावसायिक सरसावले. नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व बांधकाम व्यवसायिकांना एकत्र करून कष्टकरी मजुरांना किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायात मजुरी करणाऱ्या मजुरांवर काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर नगरपरिषदेचे प्रभाग ११ चे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व बांधकाम व्यावसायिकांची संपर्क साधला. कष्टकरी मजुरांची माहिती घेऊन सुमारे १२४ लोकांच्या घरापर्यंत जाऊन शिधावाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, नगरसेवक सोमनाथ पावसे,अनिल पवार, सचिन हगवणे, बाळासाहेब केदार, गणेश आव्हाड, समाधान गायकवाड, विलास तांबे, प्रकाश कुमावत, राजू जगताप, निवृत्ती गीते, धीरज फड, वैभव गवळी, उमेश उगले, गजानन जगताप, जालिंदर जाधव, गोरख कांदे, मयूर आव्हाड उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या हाताखाली काम करणा­या मजुरांना वेळीच सहकार्य केल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले.

Web Title:  The construction worker helped the hunger strike workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.