बांधकामाचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: August 12, 2016 23:15 IST2016-08-12T23:14:33+5:302016-08-12T23:15:21+5:30
नांदूरनाका येथील घटना : अपघाताची नोंद

बांधकामाचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू
नाशिक : बांधकामाचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़ ११) सायंकाळी नांदूरनाका परिसरात घडली़ यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव समशेर सितारेखान शेख (३०) असे असून, तो सातपूरच्या राजवाड्यातील रहिवासी आहे़
नांदूरनाक्यावरील पवारवाडीमध्ये नूतन इमारतीचे बांधकाम सूरू असून, त्याठिकाणी शेख कामास होता़ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला़ त्यास बांधकाम व्यावसायिकाने पंचवटीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)