बांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक ४६ लाखांना गंडविले : पैसे न देता खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:05 IST2017-11-19T01:03:25+5:302017-11-19T01:05:15+5:30

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणुकीतील संशयितांची नावे असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Construction Material Cheating Exploited Rs 46 Lacs: Purchase Without Money | बांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक ४६ लाखांना गंडविले : पैसे न देता खरेदी

बांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक ४६ लाखांना गंडविले : पैसे न देता खरेदी

ठळक मुद्देबांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे अशी फसवणुकीतील संशयितांची नावे

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणुकीतील संशयितांची नावे असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील कपिल शरद वाघ (राफ़्लॅट नंबर ७, हरी मंगल अपार्टमेंट) यांचे मखमलाबाद नाक्यावरील गोल्ड क्वाइन अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे़ २७ एप्रिल २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कल्याणमधील संशयित दुबे व पांडे यांनी वाघ यांच्याकडून बांधकामासाठी लागणाºया फ्लाय अ‍ॅशपासून निर्मित विटा अर्थात एएसी ब्लॉक जॉईटिंग अधेसिव (मोआर्टर) व इतर साहित्य विकत घेतले़ सुरुवातीस बांधकामाचे साहित्य विकत घेताना थोड्या-थोड्या रकमा देऊन संशयितांनी वाघ यांचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर बºयाच वेळा पैसे न देता विश्वासावर ४५ लाख ८५ हजार ९४६ रुपयांचा माल खरेदी केला़
मटेरियल सप्लायर वाघ यांनी संशयितांकडे मालाचे पैसे मागितले असता ते टाळाटाळ करू लागले़ अखेर पैसे मिळत नसल्याने वाघ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पांडे व दुबे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़ पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी संशयित रमेश दुबे, रितेश दुबे व दीनानाथ पांडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Construction Material Cheating Exploited Rs 46 Lacs: Purchase Without Money