शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रचला कट : रोकड लुटल्याचा नाशिकच्या व्यापाऱ्याचा बनाव पोलिसांकडून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 18:32 IST

सीसीटीव्ही कॅमे-यांचे त्यावेळचे चित्रीकरण तपासत संशयित हालचालींवरून चित्रीकरणात दिसणा-या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देव्यापा-याने कबुली तपासात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.डोळ्यात मिरची पूड फेकून मोटारीतील रोकड असलेली बॅग पळविली,

नाशिक : लासलगावच्या एका बॅँकेतून काढलेली नऊ लाख रुपयांची रोकड मोटारीतून विंचूर रस्त्यावरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन इसमांनी लुटल्याची घटना गेल्या सोमवारी (दि. २३) घडली होती; मात्र या घटनेचा तपास करताना नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सत्य उजेडात आणले असून, लुटीची घटना घडली नसून व्यापा-याने लुटीचा केलेला तो बनाव होता, अशी कबुली त्याने तपासात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निफाड तालुक्यातील पाचोरे बुद्रुक येथील रहिवासी असलेले शेतमालाचे व्यापारी राहुल शंकर सानप यांनी अ‍ॅक्सिस बॅँकेतून नऊ लाख रुपयांची रोकड धनादेशाद्वारे काढली. रोकडची बॅग मोटारीच्या पुढील चालकाशेजारी असलेल्या बाकावर ठेवली. दरम्यान, विंचूररोडने मार्गस्थ होताना वाहन नादुरुस्त झाले. त्यावेळी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले असता दोघा अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत डोळ्यात मिरची पूड फेकून मोटारीतील रोकड असलेली बॅग पळविली, अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर लासलगाव, निफाड तालुक्यात व्यापा-याची लूट झाल्याची घटना वेगाने पसरली व व्यापा-यांनी या घटनेचे निषेध करत लासलगाव बाजार समिती, विंचूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (दि. २४) व्यवहार बंद ठेवले होते. घटनेचे गांभीर्य व स्वरूप लक्षात घेता लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घेत तत्काळ जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक गि-हे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमे-यांचे त्यावेळचे चित्रीकरण तपासत संशयित हालचालींवरून चित्रीकरणात दिसणा-या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादी सानप यांची जबाबामधील माहिती व चित्रीकरणातील हालचाली यांच्यात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला.---गुन्ह्याची कबुलीसानप यांना खाक्या दाखवत तपासकौशल्याचा वापर करत चौकशी केली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे रोकड लुटीचा बनाव केला व मावसभाऊ आणि एका साथीदाराच्या मदतीने कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यासह गुन्ह्यात सहभागी त्यांचा मावसभाऊ अभिजित भाऊसाहेब सानप (रा. निमगाव), रमेश नामदेव सानप (पाचोरे) यांना अटक केली आहे. कटामध्ये ठरल्याप्रमाणे अभिजित याने मिरचीची पूड डोळ्यात फेकून रोकडची बॅग घेऊन पोबारा केला. तसेच रमेश याने सानप यांना दवाखान्यात दाखल केले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसRobberyदरोडा