शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा ; शुल्क भरण्यास पर्याय देण्याचे संस्थांना निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:47 IST

 ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना केल्या आहेत. 

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास पर्याय द्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संस्थांना निर्देश

नाशिक : शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसह मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिक्षण संस्थांना  ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना केल्या आहेत. सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थांकडे एक रकमी शुल्क वसुलीसाठी तगादा न लावता दोन ते तीन सुलभ हप्त्यात शुल्क भरण्यासाठी मुभा द्यावी, असे आदेश विद्यापीठातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क जमा करा, अन्यथा प्रवेश मिळणार नाही अशा अटी घातल्याने विद्यार्थ्यांनी संस्थांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पुणे विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक एक रकमी घेऊ नये, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असा सूचना केल्या आहेत. करोना लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी व पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना एक रकमी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही. सध्याची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा पाहता विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याबाबत पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असेही विद्यापीठाने सर्व संलग्नित संस्थांसाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठPuneपुणे