शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अर्ली द्राक्षांसाठी विमा लागू करण्याबाबत विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:07 IST

सटाणा : अर्ली (पूर्वहंगामी) द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी निर्यातीचे धोरण निश्चित करण्यासाठी या आठवड्यात अपेडा आणि निर्यातदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

सटाणा : अर्ली (पूर्वहंगामी) द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी निर्यातीचे धोरण निश्चित करण्यासाठी या आठवड्यात अपेडा आणि निर्यातदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत बागलाणमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समवेत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. गेल्या तीन दिवसांपूर्वी भुसे बागलाण तालुक्याचा दौºयावर असताना बागलाण तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांनी कैफियत मांडली होती. याची दखल घेत कृषीचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली द्राक्ष बागायतदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.या बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, फलोत्पादन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव, तालुका कृषी अधिकारी, सटाणा, अपेडाचे अधिकारी, विपणन विभागाचे अधिकारी तसेच कृषिभूषण शेतकरी खंडेराव शेवाळे, शेतीनिष्ठ शेतकरी कृष्णा भामरे, तुषार कापडणीस, प्रकाश शेवाळे, नीलेश चव्हाण, जिभाऊ कापडणीस आदी प्रगतिशील द्राक्ष बागायतदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सदरच्या बैठकीस सहभागी झाले होते. बैठकीत शेतकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांना भुसे व डवले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर मंत्रालयीन स्तरावर काम सुरू असल्याचे सूतोवाच केले.शासनस्तरावर तोडगा काढणारपूर्वहंगामी द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी केली. सदर मागणीवर शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन कृषिमंत्री भुसे यांनी दिले. तसेच पूर्वहंगामी द्राक्ष निर्यातीबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी येत्या आठ दिवसात अपेडाचे अधिकारी निर्यातदार यांचे सोबत नव्याने बैठक घेण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक