खरीप वाचविण्यासाठी संरक्षक सिंचनाचा पर्याय - रमेश शिंदे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:30+5:302021-08-13T04:18:30+5:30
नाशिक जिल्ह्यात या वर्षी पावसाने ओढ दिली आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक व दिंडोरी या ...

खरीप वाचविण्यासाठी संरक्षक सिंचनाचा पर्याय - रमेश शिंदे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
नाशिक जिल्ह्यात या वर्षी पावसाने ओढ दिली आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक व दिंडोरी या तालुक्यांमध्ये तुलनेतील पर्जन्यमान नेहमीच चांगले असते. परंतु, या भागातही गेल्या सात ते आठ दिवसांत पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. या भागात खरिपातील प्रमुख पीक भात असून, जवळपास ८५ टक्के भाताची लागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित लागवड येत्या १५ दिवसांत पाऊस झाल्यास पूर्ण होऊ शकेल. परंतु, जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचे येवला, नांदगाव, मालेगाव, सटाण्याचा पूर्व भाग, कळवणचा पूर्व भाग, चांदवड देवळा या तालुक्यांमध्ये पावसाने १२ ते १५ दिवस ताण दिला आहे. यात प्रारंभीच्या काळात चांगला पाऊस झालेल्या भागात पेरणी झालेली पिके निसविण्याच्या अवस्थेत आहेत. तर उशिरा पेरणी झालेल्या पिकांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांसमोर संरक्षक सिंचनाचा पर्याय आहे. पावसाने ओढ दिलेल्या काही भागांत मका, सोयाबीन, कापूस यांसारखी पिके करपण्याच्या अवस्थेत असली तरी अशा पिकांना एका सरी आड पद्धतीने सिंचन करण्याच्या प्रयत्नातून वाचविणे आवश्यक आहे. ज्या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा भागासाठी कृषी विभागाने अल्पावधीच्या बाजरी, मका यासारख्या बियाण्यांची उपलब्धता करून देण्याची तयारीही कृषी विभागाने ठेवली आहे.
120821\12nsk_28_12082021_13.jpg
रमेश शिंदे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.