वाल्मीकी जयंतीनिमित्त घोटी येथे मिरवणूक
By Admin | Updated: October 27, 2015 23:42 IST2015-10-27T23:41:39+5:302015-10-27T23:42:05+5:30
वाल्मीकी जयंतीनिमित्त घोटी येथे मिरवणूक

वाल्मीकी जयंतीनिमित्त घोटी येथे मिरवणूक
घोटी : इगतपुरी तालुका हिंदू महादेव कोळी समाज सेवा मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती उत्सव घोटी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त घोटी शहरात दिंडी व पालखी सोहळा तसेच कीर्तनाचा कार्यक्र म झाला .
हिंदू महादेव कोळी समाज सेवा मंडळ व समाजबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेची सकाळी घोटी शहरातून सवाद्य मिरवणूक, दिंडी सोहळा व ऋषींची पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळा व कीर्तन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, माजी सभापती रामदास घारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सुनील जाधव, माजी सभापती माधवराव साबळे, काशीनाथ भोईर, पांडुरंग पवार, पं. स. सदस्य जिजाबाई कौले, घोटी ग्रामपालिका सदस्य प्रा. मनोहर घोडे, धोंडीराम कौले, कैलास लोटे, बाळासाहेब झोले, कोंड्याबाई बोटे, मदन रुपवते, काळू दिवटे, उत्तम भवारी, भगवंता झोले, हिरामण कौटे, सोमनाथ घारे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, संतोष रौंदळे, दत्तात्रय गोनके, त्र्यंबक गोलवर, अनिल काळे, रामदास भोर आदि सहभागी झाले होते. सोहळा यशस्वीतेसाठी महादेव कोळी सेवा समाज मंडळाचे पदाधिकारी गोविंद गिळन्दे, दुंडीराज बेंडकोळी, लोहकरे बाबा, कौले गुरुजी, गोरख भाकरे, रामदास लोहरे, संतोष रौंदळे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)