फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सजग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:49 PM2017-12-13T12:49:02+5:302017-12-13T12:49:18+5:30

वणी - उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात राज्याबरोबर कोलकाता भागातून द्राक्ष खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांकहून होणारी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सरसावले असून द्राक्ष खरेदी विक् ीचे व्यवहार सजगतेने करण्याचा सुर उत्पादकांमधे उमटतो आहे.

Conscious grape manufacturers to prevent fraud | फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सजग

फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सजग

Next

वणी - उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात राज्याबरोबर कोलकाता भागातून द्राक्ष खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांकहून होणारी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सरसावले असून द्राक्ष खरेदी विक् ीचे व्यवहार सजगतेने करण्याचा सुर उत्पादकांमधे उमटतो आहे.
डिसेंबर महिन्याच्या अंतिम सत्रापासुन द्राक्ष खरेदी विक् ीचा द्राविडी प्राणायाम सुरू होतो. तो मे महिन्याच्या उत्तरार्धापर्यत सुरू असतो . 
द्राक्ष उत्पादनात उत्पादनात अग्रेसर दिडोरी तालुक्यात द्राक्ष खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी येतात मात्र माल खरेदी करून पैसे न देता उत्पादकांची फसवणुक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सातत्याने घडत आहेत. तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असून सदर नगदी पिक घेण्याकडे दिवसेगणीक उत्पादकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे द्राक्ष लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ़ होते आहे. त्याचा परिणाम म्हणुन प्रचंड द्राक्षे तालुक्यात उत्पादित होतात, यात काही निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करणारे उत्पादकही आहेत. निर्यातक्षम द्राक्षे खरेदी करणाºया निर्यातदाराचा पारदर्शी व्यवहार प्रणालीचा नावलौकीक तुलनात्मक कायम आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडण्याची भीती कमी मात्र देशांतर्गत द्राक्ष खरेदी विक्र ी व्यवहारात हा धोका जास्त आहे. चढ्या भावाचे आमिष दाखवून द्राक्ष खरेदी करणे भाव ठरविताना एक भाव सांगणे व पैसे देताना कमी भावाने पैसे देणे तसेच रोख व्यवहाराची हमी देणे मात्र वेळोवेळी पैसे देण्याचे वायदे करणे किंवा उत्पादकांची अडवणुक करणे व द्राक्ष खरेदीच्या अंतिम टप्यात पैसे न देता द्राक्ष खरेदी करून पलायन करणे अशा प्रकाराना प्रतिवर्षी उत्पादकांना सामोरे जावे लागते. उत्पादकांची फसवणुक होऊन आर्थिक कोंडी होते परप्रांतीय व्यापार्यावर विश्वास ठेवुन उत्पादक व्यवहार करतात या व्यवहाराची लिखापढी नसते तोंडी झालेल्या व्यवहारामुळे याला कायदेशीर आधार नसतो याचाच गैरफायदा असे व्यापारी घेतात व फसवणुक करतात. फसवणुकीची तक्र ार पोलीसात दिल्यानंतर पोलीस व्यापार्याची पूर्ण माहिती विचारतात मात्र उत्पादकाला व्यापार्याने दिलेली ती माहिती खोटी असल्याचे पुढे येते असे प्रकार प्रतिवर्षी घडतात व त्याची पुनरावृती होते. हे सर्व माहित असताना नाईलाज म्हणुन उत्पादक व्यवहार करतात. कारण अशा व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची शासनाची कोणतीही प्रणाली नाही. त्यामुळे फसवणुकीच्या मालिकेला पूर्णविराम मिळत नाही. यातुन मार्ग काढुन उत्पादकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Conscious grape manufacturers to prevent fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक