ध्वजावतरणाने सिंहस्थाची सांगता
By Admin | Updated: August 12, 2016 00:05 IST2016-08-12T00:05:31+5:302016-08-12T00:05:32+5:30
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चैतन्यदायी सिंहस्थ पर्वाची आज ध्वजावतरणाने सांगता झाली.

ध्वजावतरणाने सिंहस्थाची सांगता
ऑनलाइन लोकमत
नाशिक/त्र्यंबकेश्वर, दि. 11 - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चैतन्यदायी सिंहस्थ पर्वाची आज ध्वजावतरणाने सांगता झाली. रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी गुरूने सिंह राशीतून कन्या राशित प्रवेश करताच नाशिकच्या रामकुंडावर तसेच त्र्यंबकच्या कुशावर्त तिर्थावर ध्वजावतरण करण्यात आले. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाल्यावर त्र्यबंकेश्वर येथे भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व रोजगार हमीमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजना ज्योती, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार महेश गिरी यांच्यासह विविध साधू-महंतांच्या उपस्थितीत तर नाशकात रामकुंडावर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज, दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास महाराज आदींच्या उपस्थितीत ध्वजावतरण करण्यात आले.
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी प्रास्तावीक केले. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगेची आरती करण्यात आली.