शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पानी फाउंडेशन स्पर्धेत कोनांबे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:55 IST

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिकाल : वडझिरे व धोंडबार ठरले यशाचे मानकरी; पुरस्कार प्रदान.

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.सिन्नर तालुक्यात पाणी फाऊंडेशनसोबत हजारो हातांनी श्रमदान केले. सर्वात उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणून सिन्नर तालुक्यात कोनांबे, वडझिरे आणि धोंडबार या गावांनी वॉटरकप स्पर्धेत बाजी मारली.विशेष म्हणजे पुरस्कारासाठी शासनाने मुख्यमंत्री निधीतून प्रथम, द्वितीय यांना प्रत्येकी ५ लाख रुपये व तृतीय क्रमांकाच्या गावासाठी ३ लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनकडून नाशिक जिल्'ात ठिकठिकाणी श्रमदान करण्यात आले होते. विशेष म्हणजे, अमीर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सहा हजार नागरिकांसोबत श्रमदान केले होते. पळणारे पाणी चालते, चालणारे पाणी थांबते करणे व थांबलेले पाणी जमिनीत मुरवणे, अशा जलप्रकल्पातून गावाचा विकास होतो, याचे महत्त्व कोनांबेकरांना पटले आणि अभिनेता आमिर खानच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या सहकार्याने कोनांबेत साकारला बरड जमिनीवर महाश्रमदान करण्यात आले. ३ हजार श्रमदात्यांच्या ६ हजार हातांनी किमया करत अवघ्या तीन तासांत ११ लाख लिटर पाणी साठवणारे सलग समतल चर तयार करण्यात आले होते.तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वडझिरे गावाने जलसंधारणाच्या माध्यमातून जलक्रांती केली असून पूर्वीचे दुष्काळी गाव ही ओळख पुसण्यात येथील ग्रामस्थांना यश आले. गेल्या तीन वर्षांत वडझिरेसह परिसरातील गावे जलयुक्त झाली आहेत. वडझिरे गावाचे एकूण १२८५ क्षेत्र आहे. पिण्यासाठी ३.५५५ कोटी लिटर पिण्याच्या पाण्याची गरज असते. तसेच जनावरांसाठी १ कोटी लिटर पाणी लागते. गावाला एकूण ३.५५५ कोटी लिटर पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, यावर्षीच्या कामाचा एकूण व्याप बघता दुप्पटीने पाणी साठवण क्षमता तसेच एकूण पाणी गावासाठी मिळाले आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्र मात येथील जनतेने सहभाग घेतला. गेल्या ४५ दिवसांपासून या गावात एकजुटीने रात्रंदिवस श्रमदान केले होते. गावकऱ्यांच्या या उपक्र माला नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी, त्यांची कार्यालये यांनी एकत्र येत हातभार लावला होता.तृतीय क्र मांक मिळालेल्या धोंडबार हे गाव कोनांबे गावाच्या पुढेच असून पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने याठिकाणी नाला बर्डींग, समतल चर खोदण्यात आले. या कामामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात यश आले आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, कोनांब्याचे सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, प्रकाश डावरे, ग्रामसेवक संदीप देवरे, वडझिरेचे उपसरपंच छाया नागरे, अलका बोडके, अर्जुन बोडके, जयराम गिते, गोरख ठोंबरे, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, धोंडबारचे सरपंच चंद्रभान साबळे, हरि खेताडे, भाऊराव जाधव, चांगुणा खेताडे, ग्रामसेवक हेमंत पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.