केंद्र-राज्य सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे देशभर आंदोेलन
By Admin | Updated: January 20, 2015 01:01 IST2015-01-20T01:00:52+5:302015-01-20T01:01:34+5:30
: महाजन २१ ते २५ जानेवारी दरम्यान राज्यभर आंदोलन; गुजरातला पाणी देण्यास कॉँग्रेसचा विरोधच

केंद्र-राज्य सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे देशभर आंदोेलन
नाशिक : शेतकऱ्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतही केंद्र व राज्य सरकारची सुरू असलेली टाळाटाळ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल व डिझेलचे कमी न झालेले भाव व शेतकऱ्यांच्या भूमी संपादनाच्या कायद्यात केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या दुरुस्त्या या तीन प्रमुख प्रश्नांवर देशपातळीवर व राज्यपातळीवर २१ ते २५ जानेवारी संदर्भात केंद्र व राज्य सरकार विरोधात कॉँग्रेस मोर्चा व धरणे आंदोेलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक जिल्'ात येत्या २१ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने याप्रश्नावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले मात्र अद्यापही दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून त्याच्या वितरणासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त सरकार शोधत आहे. शेतकरी कोलमडून पडलेला असताना त्याला तत्काळ मदत देण्याऐवजी केंद्र व राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहेत. आघाडी सरकारने मागील काळात केंद्राची वाट न पाहताच नुकसान झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना मदत वितरित केलेली आहे