शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर कॉँग्रेस आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:54 IST

कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित विभागाची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दुष्काळी परिस्थितीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून चालढकल व आडकाठी केली जात असून, या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित विभागाची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी, सध्याचे शासन हे मागासवर्गीयांच्या बाबतीत अतिशय कठोर भूमिका स्वीकारत असून, त्यामुळे मागासवर्गीयांची कोंडी होत आहे. गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती देण्यात अडचणी व आडकाठी आणली जात असून, याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. आगामी काळात नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आंदोलन करण्याचा इशारा दिला. अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना शरद आहेर यांनी, काँग्रेस पक्ष हा नेहमी अनुसूचित जाती जमातीच्या न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाने नेहमीच तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना राबविल्या आहेत. परंतु सध्याचे भाजप-सेनेचे शासन हे मात्र याविरुद्ध पावले उचलून एकप्रकारचा असंतोष जनतेमध्ये पोहोचणेकामी प्रयत्नशील असल्याचे दिसते. म्हणून अनुसूचित जाती विभागाच्या वतीने वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींच्या वतीने तसेच अर्जदारांच्या वतीने तातडीने संबंधित विभागाला निवेदन देऊन अंमलबजावणी करणेकामी भाग पाडले पाहिजे. या बैठकीस डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, मनोहर आहिरे, अशोक शेंडगे, मिलिंद हांडोरे, उद्धव पवार, केदा गायकवाड, विजय अंभोरे, संजय जगताप आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस