कळवण येथे कॉँग्रेसच्या आदिवासी वनहक्क परिषदेस प्रारंभ

By Admin | Updated: May 14, 2016 16:36 IST2016-05-14T16:36:58+5:302016-05-14T16:36:58+5:30

काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी वनहक्क परिषदेस उत्साहात प्रारंभ झाला.

Congress tribal welfare council commenced at Kalvan | कळवण येथे कॉँग्रेसच्या आदिवासी वनहक्क परिषदेस प्रारंभ

कळवण येथे कॉँग्रेसच्या आदिवासी वनहक्क परिषदेस प्रारंभ

style="text-align: justify;">कळवण - येथे काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी वनहक्क परिषदेस उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस्सचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे स्वागत परिषदेचे आयोजक आणि स्वागताध्यक्ष राजाराम पानगव्हाने यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 
 
आरकेएम शाळेच्या मैदानावर सुरु असलेल्या मेळ्याव्यासाठी प्रमुख पाहुने म्हणून महाराष्ट्रचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश सरचिटणीस रामकिसन ओजा, कॉंग्रेस्सचे सचिव बाला बच्चन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पद्माकर वळवी, माजी मंत्री वसंतराव पुरके आदि उपस्थित आहे. 
 
मेळाव्यात उत्तर महराष्ट्रतील आदिवासी बांधव वनजमिनींपासून वंचित असून त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मान्यवर काय भूमिका घेतात यावर मेळाव्यात चर्चा अपेक्षित आहे. मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.

Web Title: Congress tribal welfare council commenced at Kalvan