कॉँग्रेस पाणीकपातीच्या बाजूने

By Admin | Updated: February 4, 2016 23:10 IST2016-02-04T23:09:39+5:302016-02-04T23:10:22+5:30

महासभेत नगरसेवक मांडणार भूमिका

The Congress side by side water | कॉँग्रेस पाणीकपातीच्या बाजूने

कॉँग्रेस पाणीकपातीच्या बाजूने

नाशिक : गंगापूर धरणात जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठा नसल्याने एक दिवसाच्या पाणीकपातीचा निर्णय योग्य असून, येत्या महासभेत कॉँग्रेसचे नगरसेवक पक्षाची ही भूमिका मांडतील, अशी माहिती कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंगापूर धरणात आवश्यक तो पाणीसाठा उपलब्ध नसल्याचे कारण देत महापौर अशोक मुतर्डक यांनी दर मंगळवारी एक दिवस पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपाने त्यास हरकत घेत पाणीकपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने जी आकडेवारी दिली आहे ती गोलमाल करणारी आहे. गंगापूर धरणात जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठा नाही. त्यामुळे पाणीकपात करणे गरजेचे आहे. मात्र यात भाजपा व मनसे यांनी राजकारण सुरू केले आहे. गंगापूर धरणात २० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. त्यामुळे येत्या मे- जूनमध्येच शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचे नगरसेवक येत्या महासभेत शहरातील पाणीसाठा असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून त्यासाठी सर्वेक्षणाची मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Congress side by side water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.