महागाईविरोधात काँग्रेस सेवादल रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST2021-07-05T04:11:23+5:302021-07-05T04:11:23+5:30

वाढत्या महागाईच्या विरोधात देशभर काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग ...

Congress Sevadal on the road against inflation | महागाईविरोधात काँग्रेस सेवादल रस्त्यावर

महागाईविरोधात काँग्रेस सेवादल रस्त्यावर

वाढत्या महागाईच्या विरोधात देशभर काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी सांगितले की, यापुढे शहरातील विविध ठिकाणी चौकाचौकात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाच्या चौक सभा आयोजित करण्यात येणार आहेत. आंदोलन प्रसंगी मध्य-नाशिक ब्लॉक अध्यक्ष नीलेश बबलू खैरे, अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेश पदाधिकारी सुरेश मारू, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, सुदेश (अण्णा) मोरे, अप्पा गवळी, प्रमोद घोडगे, अतुल देशमुख, चारुशीला शिरोडे, सिद्धार्थ गांगुर्डे, धोंडीराम बोडके, मुकेश दिवेदी, संतोष हिवाळे, प्रवीण काटे, मुन्ना ठाकूर, वैभव शेलार, संजय विभुते, प्रशांत उधलीकर, जगदीश वर्मा, भास्करराव मैद, राजेंद्र महाले, नंदू येवलेकर, चंद्रकांत निर्वाण, रामदास लोखंडे, राजकुमार जेफ, भूषण छाजेड, पवन आहेर, बाळा कदम, दीपक परदेशी, गौरव पवार व भूषण चोपडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

040721\04nsk_31_04072021_13.jpg

महागाईच्याविरोधात आंदोलन करतांना कँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते

Web Title: Congress Sevadal on the road against inflation