राळेगावात ईश्वरचिठ्ठीने काँग्रेसची सत्ता
By Admin | Updated: March 15, 2017 00:36 IST2017-03-15T00:35:33+5:302017-03-15T00:36:32+5:30
राळेगाव पंचायत समिती सभागृहात मंगळवारी पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या नवनिर्वाचित पंचायत समिती

राळेगावात ईश्वरचिठ्ठीने काँग्रेसची सत्ता
नाशिक : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या निवडीत शिवसेनेने सात जागांवर मुसंडी मारत जिल्ह्यातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीला चार पंचायत समिती सभापतिपदांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपा आणि माकपाच्या पारड्यात दोन सभापतिपदे गेली आहेत. काँग्रेसला मात्र एकाही पंचायत समितीवर सभापतिपद मिळविता आले नाही.
शिवसेनेने निफाड, पेठ, सिन्नर, येवला, इगतपुरी, नांदगाव या सहा पंचायत समित्यांची सभापतिपदे स्वबळावर, तर दिंडोरीत काँग्रेसच्या मदतीने सभापतिपद मिळविले. मागील पंचवार्षिकमध्ये जिल्ह्यातील सात पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. त्यात घट होऊन नाशिक, कळवण, देवळा व मालेगाव या चार पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले आहेत.
गतवेळी सभापतिपदांची पाटी कोरी असलेल्या भाजपाने चांदवडमध्ये राष्ट्रवादीच्या जोडीने, तर बागलाणमध्ये स्वबळावर सभापतिपद पटकावले आहे. माकपाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाण्यात माकपाचाच सभापती झाला. इतकेच नव्हे तर त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या जोडीने माकपाने पंचायत समिती सभापतिपद ताब्यात घेतले. काँग्रेसकडे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर या पंचायत समित्या ताब्यात होत्या. यंदा मात्र काँग्रेसची सभापतिपदाची पाटी कोरीच राहिली आहे. दिंडोरीत फक्त उपसभापतिपदावर कॉँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात नेहमीच्या युती - आघाडीपेक्षा वेगळी समीकरणे निर्माण झालेली दिसून आली.मालेगावी राष्ट्रवादीला ‘लॉटरी’मालेगाव पंचायत समितीत शिवसेना व भाजपा यांच्यात पंचायत समिती सभापतिपदासाठी रस्सीखेच होती. पंचायत समितीच्या १४ सदस्यांमध्ये शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज होती. शिवसेनेची गेल्या वीस वर्षांपासूनची पंचायत समितीवरील सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपाने चक्क राष्ट्रवादी कॉँग्रेसला सभापतिपद, तर अपक्षाला उपसभापतिपद देऊन शिवसेनेला वीस वर्षांच्या सत्तेतून पायउतार केले. शिवसेना-भाजपाच्या भांडणात राष्ट्रवादीची मात्र लॉटरी लागल्याची चर्चा आहे.