शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम द्वारका सर्कल येथील पेट्रोल पंप येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली, तसेच कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने जनतेला काही दिलासा देण्याऐवजी इंधनाचे दर, घरगुती गॅसचे दर, खाद्यतेलाचे दर वाढविल्याचा निषेध करण्यात आला. यानंतर त्र्यंबक नाका पेट्रोल पंप येथे मध्य नाशिक ब्लॉकच्यावतीने अध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पंचवटी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धव पवार यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव स्टँड येथील पालेजा पेट्रोल पंप येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. सातपूर येथेही कैलास कडलग व सहकाऱ्यांनी निदर्शने केली.
या आंदोलनात माजी मंत्री शोभाताई बच्छाव, महिला अध्यक्षा वत्सलाताई खैरे, सुरेश मारू, विजय राऊत, अण्णा मोरे, लक्ष्मण धोत्रे, समीर कांबळे, आशा तडवी, हनीफ बशीर, राजेंद्र बागुल, मुन्ना ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, अनिल बहोत, दाऊद पठाण, गुड्डी आप्पा, जावेद शेख, फारूक कुरेशी, जावेद पठाण, अरुण दोंदे आदी सहभागी झाले होते.
(फोटो डेस्कॅनवर)