शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी यांच्यानिवडीचे नाशकात फटाके फोडून स्वागत, पदाधिकाऱ्यांनी वाटले पेढे, ढोल ताशाच्या तालावर थिरकले कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:51 IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी यांच्या निवडीचे स्वागतएम.जी रोडवर फटाके फोडून जल्लोषकाँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाटले पेढे

नाशिक : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया कमी वयाचे नेतृत्व लाभले असून राहूल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र सांभाळताच शहरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पेढे वाटून शनिवारी (दि.16)आनंदोत्सव साजरा करण्यात आला.काँगेस कमिटीमध्ये ह्यनवे नेतृत्व, नवा जोशह्ण असे चित्र पहायला मिळाले. राहूल गांधी यांनी काँग्रेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पद्भार स्विकारल्यामुळे नाशिक शहर व जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून प्रमुख पदाधिकारी व कार्यत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी एमजी रोडवर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी चक्क ढोलताशाच्या तालावर ठेक्यावर धरला. त्यामुळे राहूल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने स्थानिक कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, माजीनगरसेवक लक्ष्मण जायभावे काँग्रेसच्या शहर प्रवक्ता हेमलता पाटील हनिफ शेख, बबलू खैरे, वसंत ठाकूर, ज्युली डिसुजा आदि उपस्थित होते.दरम्यान, राहूल गांधी यांच्या निवडीविषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. राहूल गांधी यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू कटुंबातूनच मिळाले असून धर्मनिरपेक्षता, पुरोगामी विचारसरणी, त्याग, बलिदानचे पाठही त्यांना स्वत:च्या घरातून मिळाले आहेत. यासर्व गोष्टी जवळून बघणारे व नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकांतून राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविणारे राहूल गांधी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होणो हे अभिमानास्पद अशल्याचे मत पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNashikनाशिक