काँग्रेस पक्षाचा विधानसभा अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST2021-02-21T04:27:58+5:302021-02-21T04:27:58+5:30
नाशिकमध्ये दाखल झालेल्या थोरात यांनी माध्यमांशी संवाद सांगताना दुसऱ्या उपमुख्यमंत्रिपदाचा विषय कुठून आला असून हे माहीत नाही. मात्र विधानसभा ...

काँग्रेस पक्षाचा विधानसभा अध्यक्ष
नाशिकमध्ये दाखल झालेल्या थोरात यांनी माध्यमांशी संवाद सांगताना दुसऱ्या उपमुख्यमंत्रिपदाचा विषय कुठून आला असून हे माहीत नाही. मात्र विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे होते आणि त्यामुळेच हे पद पक्षाकडेच राहील. विधिमंडळाचे अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. त्यात विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचा सदस्य आरूढ झालेला दिसेल असे ते म्हणाले.
इंधनाचे दर वाढत असून ते शंभर रूपयांच्या पार गेले आहेत. वाहन चालक पेट्रेाल भरतात त्यांनाच याचा फटका नाही तर बाजारातील सर्व वस्तुंशी संबंधित हा विषय आहे. त्यामुळे महागाई वाढणार आहे. केंद्र सरकार यासंदर्भात नफाखोरी करीत आहे. इंधनाच्या आडून मिळणाऱ्या पैशाचा नक्की कसा विनियोग होतो ही चिंतेची बाब आहे, असे सांगून थोरात म्हणाले की राज्य सरकारची तीस हजार कोटी रुपयांची रक्कम केंद्रशासनाकडे थकीत आहे ती दिली जात नाही दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्प बघितला तर त्यात राज्यासाठी विशेष काहीच नाही. त्यामुळे एकूणच राज्यातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे थोरात म्हणाले.