येवला तहसीलसमोर कॉँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:55 IST2019-07-11T00:53:56+5:302019-07-11T00:55:09+5:30
येवला : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले.

टाळनाद आंदोलन करून तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देताना कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
येवला : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने भूलथापा देत सत्ता काबीज केली; मात्र इंधन दरवाढ, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदी प्रश्न निकाली निघाले नाही. तिवरे धरण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कर लावण्याची घोषणा करताच झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण होत असून, अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.
सरकारने वेळीच दखल घेत शेतकरी, नागरिकांची ओढाताण थांबवावी, यासाठी सरकारला जागे करण्यासाठी टाळनाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांनी दिली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष समीर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई पालवे, प्रा. अर्जुन कोकाटे, नंदकुमार शिंदे, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, राजेंद्र गणोरे, सुकदेव मढवाई, अमोल फरताळे आदी उपस्थित होते.