शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

करवाढीविरोधात कॉँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:28 IST

महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला.

नाशिक : महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला.  महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर धरणे धरण्यात आली. यावेळी अहेर यांनी सांगितले, महापालिकेने करवाढीचा बोजा लादला असला तरी यात सरकारी कर समाविष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रत्येक मालमत्तेच्या करात दुपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे, सामान्यांबरोबरच व्यावसायिक उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. सदरची वाढ जनतेवर अन्याय करणारी आहे. अगोदरच नोटबंदी आणि जीएसटीच्या अपरिपक्व निर्णयामुळे जनता त्रस्त असून, त्यात हा करवाढीचा बोजा पडणार आहे. सदर करवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, आशा तडवी, हनिफ बशीर, लक्ष्मण जायभावे,उद्धव पवार, बबलू खैरे, प्रतिभा भदाणे, सुमन बागुल, संगीता बिरारी आदी सहभागी झाले होते.आयुक्तांना निवेदनकॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सदर घरपट्टी दरवाढ अन्यायकारक असून, ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आयुक्तांनी नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील शहरापेक्षा नाशिकचे दर खूपच कमी असल्याचे सांगत दरवाढीचे समर्थन केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका