काँग्रेसने दिली रस्त्यावर बिनतेलाची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST2021-06-20T04:12:05+5:302021-06-20T04:12:05+5:30

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी महागाईविरोधात आंदोलन करण्याची हाक देशपातळीवर देण्यात ...

The Congress gave a blast of Bintel on the road | काँग्रेसने दिली रस्त्यावर बिनतेलाची फोडणी

काँग्रेसने दिली रस्त्यावर बिनतेलाची फोडणी

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी महागाईविरोधात आंदोलन करण्याची हाक देशपातळीवर देण्यात आली होती. त्याचाच भाग म्हणून महिला अध्यक्ष वत्सला खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या महागाईच्या विरोधात व खाद्यतेलाच्या, घरगुती गॅसदराच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, यासाठी एखादे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करून महागाईमुळे सामान्य महिलांचे घरगुती नियोजन कोलमडून गेल्याचे खैरे यांनी सांगितले. याप्रसंगी माजीमंत्री शोभाताई बच्छाव, नगरसेविका आशाताई तडवी, सिराज कोकणी, निलेश (बबलू) खैरे, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, लक्ष्मण धोत्रे, डॉ सुचेता बच्छाव, अनिल बहोत, हनीफ बशीर, जावेद पठाण, शब्बीर पठाण, कैलास कडलक, नुरी अप्पा, समीना पठाण, चारुशीला शिरोडे, मीराताई साबळे, मुन्ना ठाकूर, कल्पना पांडे, दाऊद शेख आदी उपस्थित होते.

(फोटो १९ काँग्रेस)

Web Title: The Congress gave a blast of Bintel on the road