शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST

राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी

नाशिक : राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाचे अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफेल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि़ ११) शहरातून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते,राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, संरक्षणात महत्त्वाची भूमिका असलेल्या हवाई दलासाठी उच्च प्रतिची विमाने खरेदीचा मुद्दा २००० मध्ये चर्चेत आला़ यावर यूपीए सरकारने विविध देशांकडून निविदा मागवून ६३० ते ६५० कोटी रुपये किमतीची १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला़ यापैकी १८ विमाने ही फ्रान्सकडून, तर १०८ विमाने ही एचएएच कंपनीत तयार केली जाणार होती़पंतप्रधान मोदी हे २०१५ मध्ये फ्रान्सच्या दौºयावर गेल्यानंतर त्यांनी हा करार रद्द केला व प्रत्येकी १६६० कोटी रुपये किमतीची ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला़ यातील प्रत्येक विमानासाठी १०५० ते १०६० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले असून, यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे़ याबरोबरच विमान निर्मितीचे ३० हजार कोटी रुपयांचे काम एचएएल या अनुभवी कंपनीऐवजी काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ या विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान संसदेत उत्तरे देत नाही़ त्या घोटाळ्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहोचावी, यातील दोषींची चौकशी व्हावी यासाठी कॉँग्रेसतर्फे मोर्चा काढून जनजागृती केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी मोर्चेकºयांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे, वत्सला खैरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़एमजी रोडवर वाहतूक कोंडीमहात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कार्यालयापासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास सुुरुवात होणार असल्याने मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते़ मात्र, जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती़ या ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मेहेर, शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, अशोकस्तंभ अशा सर्वच ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाला़ यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली़

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण