शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:14 IST

नाशिक : काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप करत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने कॉँग्रेस ...

नाशिक : काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप करत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने कॉँग्रेस आणि राष्टवादीच्या सरकारने राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. मात्र हे आरक्षण मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीला शनिवारी (दि. २९) नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, पूजा मिश्रा, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे , महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा निशिगंधा मोगल. डॉ. कांता नालावडे, मोहिनी पत्की आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील भाजपा सरकारने मराठा आक्षणाविषयी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मंजुरी दिल्याचे सांगतानाच महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वाखालील राज्य सरकार लोकांसाठी आणलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचत नसतील तर त्यास सरकार नव्हे, तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविण्याची तयारी करीत असताना दानवे यांनी सर्व २८८ जागांवर तयारी करण्याच्या सूचनेची पुनरावृत्ती केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यानंतर युतीचा उल्लेख केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेली साशंकता संपुष्टात आली.भाजपा महिला मोर्चाचे ‘रक्षाबंधन’केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा भाजपाला यश मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रक्षाबंधन’ उपक्रम राबवून त्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मोहीम आखली आहे. त्या माध्यमातून महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मार्गदर्शन करीत अधिकाधिक महिलांशी संपर्क साधून सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेनाभारतीय जनता पार्टीने दोन खासदारांपासून ते ३०३ खासदार निवडून आणण्याचा पल्ला गाठला आहे. मात्र जेव्हा भाजपाचे दोन खासदार होते तेव्हा, काँग्रेसकडून भाजपाची खिल्ली उडविली जात होती. मात्र आज तीच परिस्थिती काँग्रेसवर आली असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्यासही कोणीही पुढे येत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याची टीका दानवे यांनी केली. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने देशात कोणत्याही पक्षाचे स्थिर सरकार येऊ दिले नाही. त्यातून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नसल्याचे चित्र निर्माण केले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास संपादन केला, त्यामुळेच जनतेने काँग्रेसला नाकारल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवेcongressकाँग्रेसWomenमहिला