शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मराठा आरक्षण द्याचेच नव्हते - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:01 IST

भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याविरोधात मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. मात्र, यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, परंतु, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी देत राज्य सरकारला सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मराठा आरक्षणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून श्रेयवादाला सुरुवात काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते-दानवेभाजपने कायदेशीर आरक्षण दिले- दानवे

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याविरोधात मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. मात्र, यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, परंतु, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी देत राज्य सरकारला सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मराठा आरक्षणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी (दि. २९) नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, पूजा मिश्रा, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील भाजपा सरकारने मराठा आक्षणाविषयी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मंजुरी दिल्याचे सांगतानाच महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वातील राज्य सरकार लोकांसाठी आणलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचत नसतील तर त्यास सरकार नव्हे तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, तर भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली असून, आगामी दिवसात रक्षाबंधन आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.  

भाजपा महिला मोर्चाचे ‘रक्षाबंधन’ केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे बहूमताचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा भाजपाला यश मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रक्षाबंधन’उपक्रम राबवून त्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मोहीम आकली आहे. त्यामाध्यमातून महिला मोर्चाच्या पदाधिकाºयांना राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मागदर्शन करीत अधिकाधिक महिलांशी संपर्कसाधून सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आवान केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाWomenमहिलाraosaheb danveरावसाहेब दानवेVijaya Rahatkarविजया रहाटकर