इंधन दरवाढीच्याविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:19+5:302021-07-09T04:11:19+5:30

नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीपासून सायकल रॅलीला सुरुवात करून मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, ...

Congress cycle rally against fuel price hike | इंधन दरवाढीच्याविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

इंधन दरवाढीच्याविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीपासून सायकल रॅलीला सुरुवात करून मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, शिवाजी रोड, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय ते काँग्रेस भवन येथे समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना शरद आहेर यांनी, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येत असल्याचे सांगितले.

या आंदोलनात प्रदेश सचिव सुरेश मारू, वत्सला खैरे, उध्दव पवार, हनिफ बशीर, स्वप्नील पाटील, मुन्ना ठाकूर, अनिल बहोत, कैलास कडलग, विजू पाटील, दिनेश निकाळे, रामकिसन चव्हाण, आदिनाथ नागरगोजे, राजकुमार जेफ, ज्ञानेश जंत्रे, अविनाश गांगुर्डे, आकाश नागर, शब्बीर पठाण, भारत पाटील, देवा देशपांडे आदी उपस्थित होते.

(फोटो ०८ काँग्रेस)

Web Title: Congress cycle rally against fuel price hike