शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भगूरला अष्टभुजा मातेच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:25 AM

येथील भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या १४व्या वर्षी भगूरच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा मातेसमोर देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथ घेतली त्या स्वातंत्र्यलक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून, दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

भगूर : येथील भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या १४व्या वर्षी भगूरच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा मातेसमोर देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथ घेतली त्या स्वातंत्र्यलक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून, दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.  भगूर शहरातील खंडोबा मंदिरात सावरकरांची अष्टभुजा देवी विराजमान आहे. घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा करून घट मांडण्यात आले असून, दररोज सकाळ- संध्याकाळ नित्यनेमाने आरती केली जात आहे. अष्टमीच्या निमित्ताने अष्टभुजा देवीच्या चक्रपूजेसाठी नवीन उगवलेले धान्य जमा करून त्याचे चक्र भरले जाते. चक्र भरण्याअगोदर देवीचे आसन हलवून जिथे चक्र भरण्याची जागा असते तिथे पाट मांडून देवीची स्थापना करण्यात येते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसराच्या दिवशी अष्टभुजा देवी व श्री खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, श्री क्षैत्र तपोवन देवी (रेणुका माता) देवळाली कॅम्प येथे सीमोल्लंघनासाठी जाऊन भेट घेऊन पालखी माघारी फिरणार आहे. सावरकरांच्या घराण्याची कुलदेवता अष्टभुजा देवीचा नवरात्रोत्सव पारंपरिक रीतीरिवाजाने भक्तीभावाने साजरा केला जात आहे. या मंदिरात खैरे कुटुंब पुजारी असून, आता त्यांची सातवी पिढी पूजा करत आहे.घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजाकरून घट मांडण्यात आले असून, दररोज सकाळ- संध्याकाळ नित्यनेमाने आरती केली जात आहे. अष्टमीच्या निमित्ताने अष्टभुजा देवीच्या चक्रपूजेसाठी नवीन उगवलेले धान्य जमा करून त्याचे चक्र भरले जाते.

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक