मेशी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 15:48 IST2022-04-03T15:47:18+5:302022-04-03T15:48:10+5:30

मेशी : येथील मेशी विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचा तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले शरद सूर्यवंशी आदी इतर मान्यवरांचा सत्कार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकात देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Congratulations to the new Director of Meshi Society | मेशी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार

मेशी सोसायटीच्या बिनविरोध नवनिर्वाचित संचालकांचा सत्कारप्रसंगी चंद्रकांत देवरेव नूतन संचालक मंडळ.

ठळक मुद्देनागीण नाला बोगदा ते मेशी पाझर तलाव १ पर्यंतच्या चारी काम चालू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता

मेशी : येथील मेशी विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचा तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले शरद सूर्यवंशी आदी इतर मान्यवरांचा सत्कार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकात देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान देवरे यांचा मागील फेब्रुवारी महिन्यात मेशी येथे सत्कार मेशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला होता. यावेळी नागीण नाला बोगदा ते मेशी पाझर तलाव १ पर्यंतच्या चारीची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर त्या मागणीचा पूर्ण पाठपुरावा चंद्रकात देवरे यांनी करून काम चालू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळवली.

त्या मागणीसाठीचे पत्र ही मिळाले असून येत्या जून महिन्याच्या आत काम पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसून लवकर काम पूर्ण होईल असे देवरे यांनी या वेळी सांगितले, तसेच शासकीय पत्रव्यवहारच्या प्रती ही गावकऱ्यांना सादर केल्या.

 

Web Title: Congratulations to the new Director of Meshi Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.