नांदेडमधील विजयाचा कॉँग्रेसकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:42 IST2017-10-13T00:42:30+5:302017-10-13T00:42:59+5:30
नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन करत घवघवीत यश मिळविल्याने नाशिक लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

नांदेडमधील विजयाचा कॉँग्रेसकडून जल्लोष
नाशिक : नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन करत घवघवीत यश मिळविल्याने नाशिक लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला.
नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवित भाजपाला धोबीपछाड दिली. या विजयाचा आनंद युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आला. राजीव गांधी भवनासमोर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी नागरिकांना पेढे वाटण्यात आले. भाजपाच्या ‘अच्छे दिन’चा यानिमित्ताने फुगा फुटल्याची प्रतिक्रिया राहुल दिवे यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक आशा तडवी, स्वप्नील पाटील, प्रसाद नागवंशी, गणेश सोनवणे, किरण जाधव, अनिकेत गांगुर्डे, गौरव कराडे, तुषार सोनकांबळे, नीलेश थोरात, आकाश रणशूर, योगेश्वर दाते आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.