उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या क्लासेस संचालकांचा सत्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:24+5:302021-02-05T05:42:24+5:30
नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिन व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त, संघटनेच्या कार्यालयात, कोरोना संकटकाळात उत्कृष्ट ...

उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या क्लासेस संचालकांचा सत्कार!
नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिन व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त, संघटनेच्या कार्यालयात, कोरोना संकटकाळात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या व संघटनेसाठी योगदान देणाऱ्या क्लासेस संचालक शिक्षकांचा तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव आमदार राहुल ढिकले व नगरसेवक अंबादास पगारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यात प्रामुख्याने, प्रमोद पाटील, भास भामरे, मायकेल फर्नांडिस, रामकृष्ण घायाळ, समीर तोतले, उज्ज्वल पंडित, जुगल जोशी, अशोक देशपांडे, सचिन जाधव, राज पवार, प्रीतिश कुलकर्णी, रवींद्र पाटील, गणेश कोतकर, धनंजय शिंदे, सुनीता बावणे, पराग घारपुरे, सचिन अपसुंदे, किरण सुर्यवंशी, किरण खाडे, युगंधर चौधरी, कौस्तुभ परांजपे, सचिन शिंदे, प्रमोद गुप्ता, प्रवीण गडाख, दर्शन मालसाने, तुषार दीक्षित, संजय जाधव, बिडवे, विष्णू चव्हाण, अर्जुन शिंदे, लोकेश पारख, अतुल आचलिया, पवन जोशी, किशोर सपकाळे, विजय बावणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश डोशी, चेतन शिंदे, योगेंद्र राजपूत, संजय कुलकर्णी, प्रदीप येवला, कृष्णकुमार वाघ, सागर पारेवाल, अरुण कुशारे, अनंत चांदवडकर, संतोष पवार, वाल्मीक सानप, मुकुंद विवेक भोर, कैलास देसले, सुभाष जाधव, नीलेश दुसे आदी क्लासेस संचालक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरुटे, विवेक भोर, अरुण कुशारे, कार्याध्यक्ष वाल्मीक सानप, सेक्रेटरी लोकेश पारख, खजिनदार अतुल आचळे आदी पदाधिकारी व क्लासेस संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.