शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा हमीभावासाठी पंतप्रधानांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:53 IST

जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व ऊस पिकाच्या दरावरून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कांद्याला हमीभाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत देशातील शेती व्यवसायाबाबत केंद्र सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.

ठळक मुद्देदिल्लीत भेट : लवकरच धोरण जाहीर करणार

नाशिक : जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व ऊस पिकाच्या दरावरून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कांद्याला हमीभाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत देशातील शेती व्यवसायाबाबत केंद्र सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मोदी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ऊस, कांदा, द्राक्ष, गहू, भाजीपाला पिकाबाबत चर्चा केली. पाऊस चांगला झाल्यास बाजारात साखरेला कमी भाव मिळतो व साखर कारखाने पूर्णवेळ चालून पूर्ण सिझन होऊन देखील ऊस शिल्लक राहतो. तसेच कांदा पिकाबाबतही दोन वर्षांपासून चांगला पाऊस पडल्यामुळे कांदा चांगला पिकला, परंतु कांदा उत्पादनाचा खर्च वाढला. त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. द्राक्ष व कांदा पिकाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.नाशिक जिल्ह्यातील कांदा या नगदी पिकाबाबत केंद्र शासनामार्फत हमीभाव देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत शिवाजी निमसे, शिरीष लवटे, नितीन चिडे, राजेश फोकणे, संजय करंजकर, नितीन खर्जुल, सुरेश सहाणे, संजय माळुदे आदी उपस्थित होते.देशभरातील नद्या जोडण्याचे सूतोवाचपंतप्रधान मोदी यांनी देशभरात शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यात येईल त्यात प्रामुख्याने जिरायती, बागायती शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, लाइट, यंत्रे पुरविणे कामी धोरणाचा समावेश असेल तसेच शेती उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व शेतीपूरक जोडधंदे वाढविण्यासाठी देशाभरात ज्या नद्या उत्तर दक्षिण वाहतात त्या नद्या पूर्व पश्चिम वाहिन्यांना जोडण्यात येणार असून, त्यामुळे राजस्थान, गुजरात, महाराष्टÑ, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू या भागात हे पाणी मिळेल. जोडधंदे व मासेपालनामुळे राज्यांचा विकास होईल, असे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीonionकांदा