चुकीच्या माहितीने विद्यार्थ्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST2020-12-24T04:14:49+5:302020-12-24T04:14:49+5:30
जेलरोड रस्त्यावर वाढला बाजार नाशिक : नाशिकरोड येथील जेलरोड रस्त्यावरील भाजीबाजार वाढतच आहे. भीमनगरपासून सुरू झालेला बाजार सेंट फिलोमिना ...

चुकीच्या माहितीने विद्यार्थ्यांचा गोंधळ
जेलरोड रस्त्यावर वाढला बाजार
नाशिक : नाशिकरोड येथील जेलरोड रस्त्यावरील भाजीबाजार वाढतच आहे. भीमनगरपासून सुरू झालेला बाजार सेंट फिलोमिना शाळेच्याही पुढे सरकला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी केवळ रस्त्याच्या एका बाजूला भरणारा बाजार आता दोन्ही बाजूला भरू लागला आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होत आहे. जेल टाकी सिग्नलपर्यंत छोटे-मोठे विक्रेते रस्त्याच्या कडेला बसेले दिसतात.
रात्रीच्या सुमारास टवाळांचा उपद्रव
नाशिक : त्र्यंबकनाका सिग्नल, जीपीओ रोड तसेच एन.डी. पटेल रोड, त्र्यंबकरोड येथील रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास अनेक टवाळखोर दुचाकीवर फिरून आरडाओरड करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. ट्रिपलसीट बसून हे टवाळखोर रात्रीच्या सुमारास रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्यांचीदेखील कुरापत काढून दमदाटी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.
बसस्थानकाजवळ पोलीस बंदोबस्त
नाशिक : ठक्कर बसस्थानक येथे उभ्या राहाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस हटविण्यात आल्या असून, पोलिसांचे गस्त पथकाचे या परिसराकडे लक्ष आहे. अनेकदा गस्ती पथकाचे पोलीस तसेच पोलीस व्हॅन या ठिकाणी थांबून रस्त्यावर थांबणाऱ्या एजंटांना ताकीद देत आहेत. येथील गर्दी आणि टवाळगिरी कमी झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.