जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपूर्वीच घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:43+5:302021-07-27T04:15:43+5:30
प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या करताना, त्या समुपदेशनाने व लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेऊन करण्याचे शासनाच्या सूचना असल्या, तरी प्रशासनाने या दोन्ही ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपूर्वीच घोळ
प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या करताना, त्या समुपदेशनाने व लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेऊन करण्याचे शासनाच्या सूचना असल्या, तरी प्रशासनाने या दोन्ही पद्धतीचा वापर न करता, कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविल्याचा निरोप सोमवारी कर्मचाऱ्यांमध्ये फिरत होता. त्यामुळे पुन्हा प्रत्येक व्यक्ती सोयीच्या ठिकाणांचाच विकल्प देण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, असे असले, तरी प्रशासनाने बदल्यांबाबत अद्याप धोरण ठरले नसल्याचे सांगितले. निकषानुसार किती कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतील, याचा अंदाज घेऊनच बदल्या ऑफलाइन करायच्या की ऑनलाइन याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे, तसेच एक ते दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या असतील, तर त्यासाठी तोंडी विनंतीनेही त्या केल्या जातील, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व माहिती हाती आल्यानंतरच बदल्या कधी, कुठे व कशा करायच्या, हे जाहीर केले जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.