नाशिक : जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून विकास कामांचे नियोजनही वेळेत केले जात नाही. त्यामुळे मुंडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची मागणी करीत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे समितीची सभा तहकूब करण्यात आली.जिल्हा परिषदेला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास सभापती खोसकर यांना आमंत्रित करण्यात आले नाही. विभागप्रमुख मुंडे रजेवर असतानाही त्यांनी पुरस्कार सोहळ्यास हजेरी लावली. त्यांचा दिरंगाईच्या भूमिकेमुळे अनेक कामे प्रलंबित असल्याचे सांगत सदस्यांनी मुंडे यांचा निषेध करीत सभा तहकूब करण्याची मागणी केल्यामुळे अखेर सभापतींनी सभा तहकूब केली.
बालकल्याणच्या सदस्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:46 IST