शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने सुरू ठेवण्याच्या सम व विषम तारखांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 13:16 IST

मनपा प्रशासनाकडून नाशिकरोड परिसरात काही भागात फिरून तेथील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कधी सुरू राहणार व कधी बंद राहणार याबाबत सांगण्यात आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या व्यापाऱ्यांना माहिती न दिल्याने गोंधळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देदुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेबाबत संभ्रम यंत्रणेत समन्वय नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सम-विषम तारखेला सुरू ठेवण्याबाबत मनपा व पोलीस प्रशासनाकडून नियोजनपूर्वक आणि एकत्रित स्पष्ट सुचना न मिळाल्याने व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला असून व्यापाऱ्यांमध्ये  सम व विषम तारखेमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पाच वाजता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचा राज्य शासनाचा आदेश आहे. मात्र राज्य शासनाकडून सर्व व्यवहार सुरळीत व सुरक्षित सुरू ठेवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सम व विषम तारखेला सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून नाशिकरोड परिसरात काही भागात फिरून तेथील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कधी सुरू राहणार व कधी बंद राहणार याबाबत सांगण्यात आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या व्यापाऱ्यांना माहिती न दिल्याने गोंधळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रात्री नऊ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास परवानगी असतानासुद्धा पोलिसांकडून सायंकाळी पाच वाजताच दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे शासनासह जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांरकडून करण्यात येणाऱ्या घोषणांची स्थानिक यंत्रणा योग्य रित्या अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून  व्यापारी वर्ग बुचकळ्यात पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नियोजनपूर्वक व्यापाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbusinessव्यवसायPoliceपोलिस