शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

शाळा सुरू होण्याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:11 IST

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, शहरातील प्रत्येक विभागातच बाधितरुग्ण सापडू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होवू लागली आहे.

ठळक मुद्देनाशिक महापालिका : आॅनलाइन शिकवायचे कसे? महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मात्र येत्या १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू

लोकमत न्यज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत शासन पातळीवरच अद्याप ठोस निर्णय घेण्याचे टाळले जात असताना नाशिक महापालिकेने मात्र येत्या १५ जूनपासून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यासाठी येत्या दोन दिवस अगोदरच शालेय कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे फर्मान शाळा मुख्याध्यापकांनी काढल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, शहरातील प्रत्येक विभागातच बाधितरुग्ण सापडू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होवू लागली आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रत्येक नागरिकाने कोरोनाची धास्ती घेतलेली असताना महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मात्र येत्या १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर करून शिक्षकांनी आॅनलाइन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा अशा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार अद्यापही शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत चाचपणी करीत असताना महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये झोपडपट्टी व मध्यमवर्गीयांची मुलेच शिक्षण घेतात. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोनाच्या संकटात रोजगाराला मुकावे लागले आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी एकतर या विद्यार्थ्यांना टॅब अथवा अ‍ॅन्ड्राइड भ्रमणध्वनी घेऊन द्यावे लागेल. सध्याची परिस्थिती पाहता ते कोणत्याही पालकाला शक्य नसले तरी, या संदर्भात काही शिक्षकांशी संवाद साधला असता, त्यांच्यामते एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ५ ते ७ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच अ‍ॅन्ड्राइड भ्रमणध्वनी असून, ते कितपत विद्यार्थ्याला वापरण्यास देतील याविषयी साशंकता आहे, शिवाय अ‍ॅन्ड्राइड भ्रमणध्वनी असून, उपयोग नाही, त्यासाठी नेट कनेक्शनही महत्त्वाचे आहे. तथापि, महापालिका शिक्षण मंडळाने या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार केलेला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.चौकट===सुट्यांमध्येही सेल्फीची सक्तीशासनाने कोरोनामुळे १६ मार्चपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश देऊन प्रत्येकाला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. नाशिक महापालिकेने आपल्या शाळा तेव्हापासून बंद केल्या, त्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असे असताना २३ मार्च रोजी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधीक्षकांनी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना दररोज घरातून आपली सेल्फी पाठविण्याची केलेली सक्ती अद्यापही कायम आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका