ंपत्रकारितेत व्रत-व्यवसायाचा संगम

By Admin | Updated: July 3, 2017 01:05 IST2017-07-03T01:05:01+5:302017-07-03T01:05:31+5:30

नाशिक : पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले असून, यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे़

Confluence of fast-business in the trader | ंपत्रकारितेत व्रत-व्यवसायाचा संगम

ंपत्रकारितेत व्रत-व्यवसायाचा संगम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकमान्य टिळक, आगरकर यांचा आदर्श असलेल्या पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाले असून, यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे़ पत्रकारितेचे मापदंड बदलले असून, जाहिरात की बातमी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, पत्रकारिता ही धर्मादाय संस्था नसून, ती व्रत व व्यवसाय या दोहोंचा संगम आहे़ पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे पत्रकारितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी या कृत्याची जाहिरात करण्याऐवजी निषेध करावा, असे प्रतिपादन झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक डॉ़ उदय निरगुडकर यांनी केले़
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि़२) बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नाशिक शाखेतर्फे आयोजित पत्रकार मेळाव्यात डॉ. निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्र म सेन, जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, नरेंद्र पाटील, सुरेश सापळे उपस्थित होते. ब्रिटिश राजवट व स्वातंत्र्योत्तर काळातही वृत्तपत्रातील अग्रलेखांमुळे लोकचळवळी उभ्या राहिल्या़ लोकशाहीच्या या चौथा स्तंभाची सरकारला धास्ती वाटायची़ मात्र, सद्यस्थितीत पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे़,असे सांगून निगुडकर मुळात पत्रकारिता आणि विश्वासार्हता या दोहोंचा संबंध हा मोबाइल व सीमकार्ड इतका अविभाज्य आहे़ वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी वाचक व प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर आपली विश्वासार्हता टिकवून ठेवल्याचे निरगुडकर यांनी सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावपटी कविता राऊत यांना नाशिक भूषण, माहिती व जनसंपर्कसंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांना पत्रकार वैभव, योगाचार्य गोकुळ घुगे यांना कामगारभूषण तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला़ प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले.

Web Title: Confluence of fast-business in the trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.