सत्ताधाऱ्यांमध्ये कामांवरून पुन्हा संघर्षाची ठिणगी

By Admin | Updated: January 23, 2015 01:43 IST2015-01-23T01:35:46+5:302015-01-23T01:43:03+5:30

अध्यक्ष-उपाध्यक्षांमध्ये शीतयुद्ध? ‘लेटर बॉम्ब’चा वणवा

Conflicts of Conflict Against Workplace | सत्ताधाऱ्यांमध्ये कामांवरून पुन्हा संघर्षाची ठिणगी

सत्ताधाऱ्यांमध्ये कामांवरून पुन्हा संघर्षाची ठिणगी

  नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या (दि.२३) सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आली असून, या सभेत सत्ताधाऱ्यांमधीलअंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सर्वच विभागांच्या विशेषत: कामांच्या प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेशबाबतच्या फायली अवलोकनार्थ आल्या पाहिजेत, असे जे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या लेटरबॉम्बवरून बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची अध्यक्षांवर खप्पामर्जी झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Conflicts of Conflict Against Workplace