शेतकऱ्यांच्या बळकावलेल्या जमिनीवरील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:44+5:302021-08-13T04:17:44+5:30

रहिवासी संकुलात अनधिकृत व्यवसाय लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : शेतकऱ्याची फसवणूक करून बळकावलेल्या जमिनीवर इगतपुरी महामार्गालगत असलेल्या केपटाऊन व्हिला ...

On the confiscated land of the farmers | शेतकऱ्यांच्या बळकावलेल्या जमिनीवरील

शेतकऱ्यांच्या बळकावलेल्या जमिनीवरील

रहिवासी संकुलात अनधिकृत व्यवसाय

लोकमत न्युज नेटवर्क

इगतपुरी : शेतकऱ्याची फसवणूक करून बळकावलेल्या जमिनीवर इगतपुरी महामार्गालगत असलेल्या केपटाऊन व्हिला रहिवासी संकुलात सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर कारवाई व्हावी ही मागणी करीत स्वातंत्र्यदिनी (दि.१५) शेतकरी अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना देण्यात आले आहे.

मौजे इगतपुरी येथील सर्व्हे नं. २२४/१,२२४/२ पैकी लेआउट प्लॉट क्र. १ व २ या मिळकती लगत सर्व्हे नं. २२५ची मिळकत असून सदर जमिनीवर शेतकरी सखाराम भिकाजी खातळे यांची फसवणूक करून श्री साई डेव्हलपर्स यांनी केपटाऊन व्हिलाज रहिवासी संकुल बांधले. याबाबत न्यायालयाने व्हिलाज बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले असून ही बाब न्यायप्रविष्ट असूनही या संकुलात अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे सुरू आहेत. येथे येणारे पर्यटक मद्यप्राशन करीत धिंगाणा घालत आहे.

या संकुलात वेश्या व्यवसायसह अनेक अमली पदार्थाचे सेवन व विक्री केली जाते, यामुळे स्थानिक रहिवासी व संबंधित शेतकरीच्या कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलीस ठाणे व तहसील कार्यालय आणि पोलीस अधीक्षकसह जिल्हा अधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले, मात्र संबंधितांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.

तक्रार केली म्हणून शेतकरी सखाराम खातळे यांना डेव्हलपर्सचे अधिकारी जिवे मारण्याची धमकी देत असल्याने अखेर रविवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे अमरण उपोषणास बसणार आहे.

शेतकरी खातळे यांची वडिलोपार्जित शेतजमीन दादागिरी व धाकदपटशा करीत बळकावून अनधिकृत व्यवसाय करून मोठ्या प्रमाणावर अर्थिक उलाढाल करून शेतकरी व त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाहापासून वंचित केल्याने या व्हिलाजच्या बंगल्यांना सील करावे व न्यायप्रविष्ट निकालाची प्रतिक्षा करावी, असे यावेळी शेतकरी खातळे सांगितले.

यावेळी केपटाऊन व्हिलाज रहिवासी संकुल परिसरातील स्थानिक रहिवासी गौतम गरूड, भगवान धोंगडे, विष्णू खातळे, गोपाळ जाधव, यशश्री खातळे, अर्चना खातळे, प्रमिला खातळे, सखाराम खातळे आदींनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

(१२ इगतपुरी)

शेतजमिनीची फसवणूक झाल्याप्रकरणी अमरण उपोषण करण्याबाबत नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना निवेदन देताना शेतकरी सखाराम खातळे व स्थानिक रहिवासी.

120821\12nsk_12_12082021_13.jpg

शेतजमिनीची फसवणुक झाल्याप्रकरणी अमरण उपोषण करण्याबाबत नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे यांना निवेदन देतांना शेतकरी सखाराम खातळे व स्थानिक रहिवासी.

Web Title: On the confiscated land of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.